Block for installation of Gantry on Yashwantrao Chavan Expressway
यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर गॅन्ट्री बसविण्यासाठी ब्लॉक
२४ जानेवारी रोजी दुपारी १२ ते २ या वेळेत गॅन्ट्री बसविण्याचे काम करण्यात येणार
पुणे : यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर हायवे ट्रॅफीक मॅनेजमेंट सिस्टीम अंतर्गत पुणे वाहिनीवर कि.मी २४.२५०. येथे गॅन्ट्री उभारण्याचे काम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत २४ जानेवारी रोजी दुपारी १२ ते २ या वेळेत करण्यात येणार आहे. या कालावधीत पुण्याकडे जाणारी सर्व सर्व प्रकारची वाहने (हलकी तसेच जड-अवजड वाहने) यांची वाहतूक बंद राहील.
वाहनाधारकांना पर्यायी मार्गाने प्रवास करता येईल. मुंबईहून पुण्याकडे जाणारी हलकी वाहने शेडुंग फाटा कि.मी ८.२०० येथून वळवून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ जुना मुंबई-पुणे महामार्गावरुन शिंग्रोबा घाटातुन मॅजिक पॉईंट कि.मी ४२.००० येथून पुन्हा द्रुतगती महामार्गावरील पुणे वाहिनीवर मार्गस्थ करण्यात येतील, असे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने कळविले आहे.
Hadapsar News Bureau
हडपसर न्यूज ब्युरो
hadapsarinfomedia@gmail.com
One Comment on “यशवंतराव चव्हाण द्रुतगती मार्गावर गॅन्ट्री बसविण्यासाठी ब्लॉक”